प्रेम, वासना, गरज कि आणखी काही............???

Started by amitunde, February 21, 2012, 10:49:40 PM

Previous topic - Next topic

amitunde

प्रेम, वासना, गरज कि आणखी काही............ ???   

पुण्यात राहणाऱ्या मावशीकडे काहीतरी कामानिमित्त गेलो होतो. मावशीच्या घराजवळच एका विख्यात कॉलेजचे मुलींचे होस्टेल आहे. सहज बोलता बोलता त्यांचा विषय निघाला आणि मावशी सहजच बोलून गेली कि, आजच्या या मुली फारच बिनधास्त आहेत. अगदी बेधडक जातात आणि Abortion  करून येतात. मावशी अशा अविर्भावात बोलली कि जणू हे सर्व तिच्यासाठी नॉर्मल आहे परंतु मी मात्र क्षणभर चांगलाच हबकलो.

अजून एक अशीच घटना घडली. माझा एक मित्र जो दिसायला अतिशय सुंदर नि भारदस्त आहे त्याला एका मुलीने One Night  Stand साठी विचारले होते आणि तेही इतक्या सहजतेने कि जणू एखाद्या मुलाकडे आपण कोणत्या तरी विषयाच्या Notes मागत आहोत. मित्राने नकार दिला ती गोष्ट वेगळी.  पण अशा गोष्टींकडे केवळ एक घटना म्हणून न पाहता व्यापक सामाजिक परिस्थितीत डोकाविण्याची गरज आहे.

Live  In  Relationship हा शब्द भारतीयांसाठी नवीन आहे. कायद्यान इथे त्याला मान्यता देखील नाही. परंतु आजकालचे तरुण थोड्याफार प्रमाणात त्याच पद्धतीने जीवन जगत आहेत. विशेषता शिक्षणासाठी घरापासून दूर असणाऱ्या मुला-मुलींमध्ये हे प्रमाण चिंता करण्यासारख आहे. घरातील लौकिक श्रीमंती, अफाट पैसा, कुणाचे बंधन नाही त्यामुळे हि वृत्ती फोफावत जाते.

कॉलेज जीवनात प्रेम या शब्दाखाली या नात्याला सुरुवात होते आणि नंतर "ढाई अक्षर प्यार के", "प्रेम आंधळ असत", अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नैतिकतेची बंधने झुगारली जातात. Kissing Day, Hug Day,Valentine Day अशा दिवसामुळे याला उघड-उघड प्रोत्साहन दिले जाते. याचाच परिणाम म्हणून आता बऱ्याच ठिकाणी Love Point, Couple  Pointच्या नावाखाली लैंगिक चाळे सुरु असतात. प्रेम म्हणजे शरीर संबंध आलेच कि, असा खुलासा केला जातो. या वयात आकर्षण असणार हे समजू शकतो पण काळजी घेणे, जबाबदारी स्वीकारणे, सन्मान करणे व समजून घेणे म्हणजे प्रेम असत कि  फक्त शरीरसंबंधपुरत  मर्यादित असत  ते  प्रेम? आपण आपल्या मनावर, भावनांवर थोडाही नियंत्रण मिळवू शकत नाही का ?? 

आजकाल प्रत्येक गोष्ट करण्याच वय खाली येऊ लागलंय. १०० वर्षाच आयुष्य १० वर्षात जगण्याची मानसिकता आढळून येत आहे. काही वर्षापूर्वी पोर्नोग्राफी मागझीन १४-१५ व्या वर्षी चाळल जायचं व ते हि एखादा दुसरा मुलगा पाहू शकायचा. पण आजकाल सर्व अगदी Easily उपलब्ध आहे. त्यामुळे शरीर व होर्मोनिक लैंगिक अनुभवासाठी लवकर Mature होतात.

मुलाचं प्रमाणाबाहेर इंटरनेट वापरण, अगदी कोवळ्या वयात नको त्या संगती, पालकांचे दुर्लक्ष यांच्या जोडीला T.V व. सिनेमा आहेच.  एकंदरीतच काय उत्तेजित करणारी दृश्य प्रंचंड प्रमाणात उपलब्ध आहे. पुस्तकात वाचलंय, सिनेमात बघितलंय मग करून बघायला काय हरकत आहे, अशी प्रवृत्ती वाढत जाते.त्याला वेळीच  आवर घालायला हवा.

आजकालचे सुज्ञ पालक मुलामुलींच्या एकत्र असण्याला, घरी उशिरा येण्याला  विरोध करीत नाहीत. आणि नेमका याचाच फायदा आजची पिढी घेत आहे. पूर्वीच जून घड्याळ नवीन पिढीन बदलल. ते आता कितीतरी पटीन वेगान पळतंय पण त्याचे काटे जर योग्य पद्धतीने पुढे सरकले नाहीत तर आयुष्याचे बारा वाजतात हेही ध्यानात घ्यायला हवे.

वय वेड असत पण या वेड्या मनाला शहाण ठेवणार मन असतंच ना ! या वयाला योग्य रीतीने हाताळण्याची गरज आहे. प्रेम वगैरे योग्य वयात घडू शकत पण तोपर्यंत वाट बघण्यास शिका. स्वतच स्वतावर बंधने घालून ती जर अमलात आणल तर तीच तुम्ही तरुण असूनही सुज्ञ असण्याची खुण आहे. विचार करा. 



अमित सतीश उंडे, सांगली 

Menthos143

kharach aahe...saglikade nusta premachchya navakhali vyabhicharch chalu aahe..........!       >:(

santoshi.world



ajinkya hadawale

super dude......................  aaj kal sharirik sambhandh mhanjech prem asach sarvancha gairsamaj zala ahe ................ kharach aaj kalchi pidhi khupach pudhe chali ahe .............. ani prem fakt ani fakt sex mhnunach tikale ahe ...................


jyoti salunkhe

Ho Barobar aahe .........  kadhi kadhi premamadhe padun khup vaet decision lok ghetat.......aani mag aayush bhar pachtava hoto..................................  lekh khup  chan aahe  :)


Pallavi Doke

Ho aajkal he asech chalu ahe.. Pan mla vatte yat aai-baba na dosh deun upyog nahi.. Karan tyanche kam mulana changle sanskar dene ahe je ki te detata.. Pan ekada vayat alyananatr kai karave ni kai nahi he jyla tyla kalayla have.. ani mla tar ya hi pudhe ase mahnayche ahe, ki thik ahe sansakar,apli sanskruti nka vichar karu pan atleast apan je vagtoy he svatala tari patatay ka,yacha vichar nakki karayla hava.. aajkal PREM mhnje kai he tar lokana kalat nahich.. Fakat tyla ahe GF,tila ahe BF mhnun mla hi hava.. ya vicharamule fashion zali ahe.. aksharsh kilas yete ya goshtinchi.. Muki janavare hi shrutiche rule palun jagtat ni manse.. Western culture chi copy fakat yach  goshtisathi keli jate.. Baki kiti chan goshti ahet tya ghyavya na tya lokankadun..  Ya topic var jevade bolave tevade kamich ahe.. avade khare ki khup sarya goshti ahet jyamule aajkal che generation avadi forword ahe..  Pan aplya sarkhi lok ahet ajun.. dukh yache ki je aplyala kalte ahe he saglyana ka kalat nahi.. pan Hi gosht zali yuth baddle.. pan ankhi kahi parkar chaltat aplya samajat jyat married men,women ahet je ki >30 age che.. tyanche hi ase prakar chaltat.. bas karte ata mla chid yete ahe he sagle khup bhyankar ahe.. 

Dipak Mankar

Khup hart touching Barbara massage ahe but Aaj chy pidhila tyachi garaj ahe.....Ekda jar wakde paul padle tar life madhe swatala tar hotoch pan family , relative , friends and etc....yana pan khup trass hoto


Ya sathi sarv palkani REGE marathi film paha ....watles tar tickitache paise mazykadun ghy ....dbmankar@bajajauto.co.in ha maza mail id ahe ....posible asel tar share kara ase thoughts ....