माझीही गत अशीच होती.......!!!

Started by avinash.dhabale, February 22, 2012, 05:34:09 PM

Previous topic - Next topic

avinash.dhabale

माझीही गत अशीच होती.......

तुझी हि गत असताना,
माझी गतही वेगळी नव्हती,
तू मजसाठी जागताना ,
मी देखील निजली नव्हती......

केव्हाच उमगले कवितेचे अर्थ तुझ्या,
पण अबोलीची फुले मीही वेचली होती,
कातरवेळी तू अश्रू टिपताना,
माझी पापणीही भिजली होती.........

तू आठवणीचे तुषार वेचताना,
मी तयांत चिंब भिजले,
जाताना खोतान हसला तेव्हा,
क्षण साधाया मीही हसले.......

तू शब्दांविना बोलताना,
या नयनी मीही वदले,
वेड्या त्या चातकापरी,
सैरभैर मीही फिरली होती ......

नकोरे आता काही बोलू,
मनाचा बांध तुटेल माझ्या,
तुझा तू तेव्हा नसताना,
माझी मीही राहिली नव्हते....

तुझी हि गत असताना....
माझी व्यथाही वेगळी नव्हती....
माझी व्यथाही वेगळी नव्हती....
**********अविनाश************

jyoti salunkhe

kahi shabt hote othavar pan bolnyachi himat navti ...........
mazhi gat hi kahi ashich hoti............ :)
swapna ubhe hote daravar dole band karnyachi vel navti.....
mazhi gat hi kahi ashich hoti............ :)

avinash.dhabale

@jyoti- wa sundar kalpana.....  mazi hi kavita "ji saryanchi gat" hya mazyach kavitela tine dilelan uttar ahe... ti pan nakki wacha....

SIA

WOW!!!KHUP SUNDAR lihall ahe khup awdli hi kavita
नकोरे आता काही बोलू,
मनाचा बांध तुटेल माझ्या,
तुझा तू तेव्हा नसताना,
माझी मीही राहिली नव्हते... he line khup chan ahe really u r g8!!

jyoti salunkhe

#4
Very Nice Avinash.........and thanx for the rply :)


avinash.dhabale

thank u Jyoti... u u r welcome....!!! eka kavila ek changala shrota bhetala hyapeksha ajun mothe kay... thanx for being the same....!!! :)