तू...!!!

Started by Shantanu Deshpande, February 18, 2026, 11:56:27 AM

Previous topic - Next topic

Shantanu Deshpande

तू आकाशी सळसळणारा उधानलेला वारा.
मी वाऱ्याच्या हिंदोळ्यावर उडता मोर पिसारा.

तू तांबड्या क्षितिजा वरल्या झरझर पाऊसधारा.
मी भिजूनही कोरडाच तो स्तब्ध समुद्र किनारा.

तू विणेच्या छेडलेल्या सप्तसुरांचा नाद.
मी एकांती पुकारलेली माझ्यामधली साद.

तू पहाटे उमललेला टवटवीत मोगरा.
मी मकरंदच्या प्रतिक्षेतला सैरभैर भोवरा.

तू धरणी, आकाश, फुले,झाड़े तूच दिशा दाहि.
मी उरतोच कुठे ते शोधन्याची भ्रांत ही मज नाही.

तू रामभजनी आळवलेल्या भूपाळीची धुंद.
मी शेवटाच्या भैरवितला एक सुर स्वच्छंद.
.................... एक सुर स्वछंद.
— शंतनु देशपांडे
-8793732117