पहिला बहर....................!

Started by महेश मनोहर कोरे, February 24, 2012, 11:53:28 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

ये प्रियतमे
तू लाजू नकोस  गं
वेड्यासारखी अशी
वेंधळू नकोस गं

जेव्हा पाहिलं तुला
नव्हतीस अशी हळवी
भीती दाखवलीस तर
ओठांना लागेल वाळवी

मी असा ठार वेडा
तू अशी कोवळी
भर पावसात सुद्धा
मग जाणवते पोकळी

पहाटेची दाट धुके
हरवती स्वप्नात
शहारत्या धुंदीत
अडकतो तुझ्या ओठात 

ये देवा ......
तिला सांग ना
माझ्या या स्वप्नकला
ती अल्लड विसरते
माझ्या या रासलीला

ती अल्लड विसरते
माझ्या या रासलीला



                            महेश मनोहर कोरे

                            ९७६२६९९१९३ पुणे.