भ्रम, दुःख आणि शून्याची वाट

Started by dinesh.belsare, March 11, 2026, 05:40:21 PM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

वर्तमानात न रमणारे मन,
कधी भूत तर कधी भविष्यत रमतं;
ज्याने स्व-तोल सांभाळायचा,
ते बेताळ वानरासारखं पळतं.

आवड त्याला घडलेलं आणि घडेल त्याच्यात,
सुख मागे किंवा पुढे शोधतं.
आत्ता इथे नाही, कधी तरी कुठे—
याला नाही पटत आणि गोंधळात शिरतं.

शोधून दुःखांना कवटाळायचं,
मग खूप काळ त्याला धरून ठेवायचं.
स्वतःला ओरडायचं, टोचायचं—
व्याकुळ होऊन दुःख अग्नीत जळवायचं.

स्वप्नांचा प्रिय काळ हा याचा,
निद्रेतलं स्वप्न जागृतीत हा पाहतो.
ना जगतो, ना जाणतो—
भ्रम कोणते? काय शाश्वत?

आस धरुनी हा उद्याची,
कालचं धरुनी मिठीशी;
झगडतो, झुंजतो—सुख उद्याचं स्वप्नातो,
पर स्वभावे राहुनी, दुःख-दरिद्र आजच भोगतो.

ठेवा कुणी याला धरुनी,
स्वगृही आणा परतुनी;
लयात बुडवा, शून्य करूनि—
समुद्रभावे लाट शिरुनी.