तू : चैतन्यस्वरूप शक्ती

Started by dinesh.belsare, March 11, 2026, 05:47:19 PM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

जन्म ह्या जगी तुझ्याने,
जगण्यासही आधार तू ।
शक्ती तू, भक्ती तू,
श्वास तू अन् मुक्ती तू ॥

तू खान रत्नांची जणू,
आरंभ तू, आधार तू ।
अनमोल रत्ने उधळिली,
ह्या भूस्थळी, आसमंतात तू ॥

माय झाली, लेक झाली,
भगिनी, संगिनी, रक्षक कधी ।
सोसली भर आभाळ दुःखे,
तरी आज तटस्थ, धीरदत्त तू ॥

काल तू तशी कालची,
आज तू साजिरी आजची ।
उद्या भरारी घे अशी,
जशी शक्ती आसमंती विजेची ॥

तू म्हणुनी जगी चैतन्य हे,
असण्या तुझ्या हे स्वर्गापरी ।
नसणे तुझे हा भ्रम व्यर्थचा,
चांदी भास शिल्पी उरी ॥