एक धागा ......

Started by महेश मनोहर कोरे, February 27, 2012, 02:12:04 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

एक तिची तर आठवण आहे,
जी मनातून जात नाही.....
एक तिचाच तर विचार आहे
जो डोक्यातून जात नाही....
जितक विसरायला जावं...
तेवढी जास्तच आठवन येते ..
.. मन आपोआपच अधीर होत .....
''एवढ कुणाच्यात का गुंतत जातं ....?
''
एकदा सहजच बोलून गेली ती.....
पण कस सांगू तिला......
तुझ्यातून जेवढ बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय
तेवढाच आता अडकत चाललोय.....
अजूनचच जास्त गुंतत चाललोय.....
मला माहिती आहे कि .....
मी जमिनीवरून कितीही उड्या मारून
हात उंचावला तरी....
चंद्राला तर हात लावू शकत नाही.......
याची कल्पना असून सुद्धा
हे नाजूक मन तिचे स्वप्न बघायचे थांबत
नाही.....
एक तिची तर आठवण आहे, जी मनातून
जात नाही....!