गणित काळाचे

Started by शिवाजी सांगळे, March 17, 2026, 12:11:32 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गणित काळाचे

जिर्ण झाली पुस्तके, शुष्क झाली फुले,
बदलले चित्र हे, कालौघात स्पष्ट झाले!

रंग विरला नी गंध हरवला पाकळ्यांचा
मुखपृष्ठ, साजिरे पुस्तकाचे काळवंडले!

भावना, विचार, संवेदना का हरवल्या?
शोधता शोधता हळूवार मन व्याकुळले!

कुठवर साथ, अन् त्यांना उरी बाळगावे
प्रश्न एकाएकी, मनी आज का प्रकटले?

जपावा अंता पर्यंत ठेवा उगा का वाटते
त्यांना ना मला,गणित काळाचे उमगले!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९