पानगळती कधीचीच सरलेय...

Started by karan jadhav, February 28, 2012, 01:35:05 AM

Previous topic - Next topic

karan jadhav

बेभान मनाला आज,
आवरु नकोस
ढळ्णारा पदर उगाच,
सावरु नकोस...

ढळू दे, त्याला ढळू दे
गळू दे, संयम गळू दे...
ऊरी लपलेल्या भावनांना
फुलू दे, आज फुलू दे...

मिठीत चंद्र घ्यावासा वाटतो,
मग घे त्याला...
स्पर्श वार्याचा हवासा वाटतो,
लगट करु दे त्याला...

थिरकतात पाय तुझे
मग बेभान होऊन नाच...
आरशात बघ स्वत:ला,
स्वत:चाच चेहरा वाच...

काय दिसतेय तुला...सांग ना...
सुकलेले ओठ,
मग त्यांची प्यास भागव..
विझलेले डोळे,
मग त्यात आस जागव...

जग आजची रात्र सखी..जग
ती ही तुझ्या सारखीच सजलेय...
ऊमलु दे आज देहाला तुझ्या
पानगळती कधीचीच सरलेय, कधीचीच सरलेय...
=================================
करण जाधव...[सखीला समजावताना..]
=================================

santoshi.world

nice .... mala hi shrunagarik kavita vatali thodi ......... can I move it to that section?

केदार मेहेंदळे

khup chan...... kharach srungarik kavita aahe.... khup awadli

karan jadhav


MK ADMIN


karan jadhav

tumha sarvanche replies ankhi barach lihayla prerit kartat :-)