शब्दांचे शब्दांशी असे वागणे

Started by shardul, February 28, 2012, 11:08:56 AM

Previous topic - Next topic

shardul

गोठून गेले शब्द सारे,आटून गेली हि पाने

गर्द विचारी शाईत,घोटून चालली लिखाणे


लपविण्या दुखं,ठिगळ सुखाचे जोडावे किती

रोजचेच चाले सारे,जिवंत दिसण्याचे बहाणे


तडे मनास देवूनी,ओघळत्या काचा आसवांच्या

प्रवास तो मनभराचा,अन असे कनभर चालणे

निसटुनी जाती हातातुनी हिंदोळे ओळीवरले

ओठातील शांततेचे होई मग डोळ्यातुनी बोलणे


मुक्त व्हावी न व्हावी,दाद तुझ्या स्तब्धतेत दडलेली

मी समजून घेतो,ते शब्दांचे शब्दांशी असे वागणे



Original Author : (निलेश) 

केदार मेहेंदळे