बाबुराव

Started by केदार मेहेंदळे, March 01, 2012, 03:31:53 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 
काही मुलं वाड्यात क्रिकेट खेळत होती. एकानी बॉल जोरात मारला आणि तो बाबुरावांच्या  घरात गेला. बाबुराव चिडले आणि बाहेर येऊन मुलांना ओरडायला लागले
"काय रे. दिवसभर नुसते खेळता. अभ्यास काही करता कि नाही?"
मुलं बिचारी हो म्हणाली
"मग सांगा बर कुतुबमिनार कुठे आहे?" मुलं काय बोलणार. त्तोंड पडून उभी राहिली.
"कसं माहित असेल? त्या करता बाहेर फिरायला लागत." बाबुराव बॉल घेऊन घरात गेले.
दुसर्या दिवशी पुन्हा बॉल बाबुरावांच्या  घरात गेला. बाबुराव चिडले आणि बाहेर येऊन मुलांना ओरडायला लागले
"काय रे. दिवसभर नुसते खेळता. अभ्यास काही करता कि नाही?" मुलं बिचारी हो म्हणाली
"मग सांगा बर ताजमहाल  कुठे आहे?" मुलं काय बोलणार. त्तोंड पडून उभी राहिली
"कसं माहित असेल? त्या करता बाहेर फिरायला लागत." बाबुराव बॉल घेऊन घरात गेले.
तिसर्या दिवशीही बॉल पुन्हा बाबुरावांच्या  घरात गेला. बाबुराव चिडले आणि बाहेर येऊन मुलांना ओरडायला लागणार इतक्यात एका  मुलांनी  पुढे येऊन बाबू रावांना विचारले
"गणपतराव कोण महितेय्त का?" बाबुराव नाही म्हणाले.
"कसं माहित असेल. त्या करता घरात रहाव लागत!" :D ;) ;D   author unknown.



vaibhav2183