तु जवळी येता

Started by SAGARSUT, March 04, 2012, 04:33:01 AM

Previous topic - Next topic

SAGARSUT

.तु जवळी येता.

प्रिये मी बेभान का होतो?
तु जवळी येता.
शांत असुनी तुफान का होतो?
तु जवळी येता.

तुझ्या श्वासांचा सुगंध येतो.
ओळखीचा गंध येतो
वारा लडीवाळ का होतो?
तु जवळी येता.

तुझ्या नजरेचा प्रहार होतो
कन कन अंगार होतो.
जखमेवाचून घायाळ का होतो?
तु जवळी येता.

उडाण,
.पंकज सागरबाई विनोद कांबळे (सागरसुत).

केदार मेहेंदळे



jyoti salunkhe