पाठीराखा तु समर्था

Started by शिवाजी सांगळे, March 24, 2026, 02:54:44 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाठीराखा तु समर्था

करु कशाला उगाच चिंता,पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण,जीवन माझे अवघे आता ||धृ||

भय दु:खातून देते मुक्ती, भक्तवत्सल कारुण्य मुर्ती
आहे अशी अपार शक्ती, थोर तुमची ब्रम्हांडी किर्ती
सर्वांचे दयाळू तारणहर्ता, तुम्ही भक्तांचे रक्षणकर्ता

करु कशाला उगाच चिंता,पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण,जीवन माझे अवघे आता ||१||

दत्तगुरुंचेच स्वरूप तुम्ही,नाम आशेचे वटवृक्ष स्वामी
पाठीशी असता काय कमी,तव कृपेचे याचक आम्ही
व्हा कृपाळा आमचे त्राता,हे ची मागणे मागतो आता

करु कशाला उगाच चिंता,पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण,जीवन माझे अवघे आता ||२||

नामजपाने चिंता हरती, शांती लाभते अक्कलकोटी
सकलांची तु कारुण्यमुर्ती, दृष्टी असावी आम्हावरती
कठीण काय कृपा होता, घ्यावे शरण 'शिवास' आता

करु कशाला उगाच चिंता,पाठीराखा जर तु समर्था
ठायी तुझ्या करतो अर्पण,जीवन माझे अवघे आता ||३||

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९