माझी गाणी: नागपंचमी

Started by prasad26, March 04, 2012, 06:47:30 PM

Previous topic - Next topic

prasad26

एक नवविवाहित युवती नागपंचमी च्या सणासाठी एकटी  माहेरी आली असते. सण झाल्यावर ती परत सासरी चालली आहे.  तिची जिवलग मैत्रीण तिला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशी पर्यंत आली आहे आणि तेंव्हा ती युवती तिच्या मैत्रिणीस सांगत आहे --

नागपंचमी

सखे ग बाई, निरोप मज देई
मी आता ग माझ्या घरी जाई, सखे बाई

नागपंचमी, येऊन गेली ग, झाले चार दिस
मन माझे सये, झाल वेडापिस, भेटण्या पतीस
सखे ग बाई

तू काढलेली, रंगली मेंदी ग, माझ्या हातावर
दाखवता प्रियास, आवडेल फार, चुंबिल तो कर
सखे ग बाई

तिकडे ग तो, बैचेन मजसाठी, असेल राजा
नको ग फार त्याला, विरहाची सजा
मला हि त्याची इजा, सखे बाई
सखे ग बाई

दिवाळीच्या सणा, येईल मी जेंव्हा, पुन्हा माहेरी
असेल तो बरोबरी, सांगते खरोखरी
फिर तू माघारी सखे  बाई
सखे ग बाई

-----प्रसाद शुक्ल

केदार मेहेंदळे