माझी गाणी : लावणी- पुनवेच चांदन

Started by prasad26, March 04, 2012, 06:54:11 PM

Previous topic - Next topic

prasad26

लावणी : पुनवेच चांदन

फार दिसांची इच्छा माझी राया मी तुम्हा सांगते
तुमच्या  माझ्या प्रीतीला सखया  पुनवेच चांदन पिउदे

कोरस - आता लवकरात लवकरी, सजणा  यावे झडकरी
             हिन ध्यास धरला उरी, तुम्ही इच्छा करावी पुरी
             माझ्या सजणा तू र  माझ्या राया तू र

नटून थटून येईल मी सजणा तुमच्या बरोबरी
चंद्रकोर कुकवाची कोरेल माझ्या गोऱ्या भाळावरी
अंगाला मी नेसेल तुमचा आवडता शालू भरजारी
गळ्यात घालेल मी माझ्या साज सोन्याचा कोल्हापुरी
तुमच्या संगे किरणात चांदाच्या शृंगार माझा  नाहुदे
तुमच्या  माझ्या प्रीतीला सखया  पुनवेच चांदन पिउदे


भाळीतो मजला तुमचा हा मर्दानी रुबाब
फिके पडतील तुमच्या पुढती दिल्लीचे नवाब
संगतीत तुमच्या सखया गालावरती फुलती गुलाब
धुंद चढविते मजला तुमच्या श्वासांची मस्त शराब
शिणगाराचा फुलुनी पिसारा मोर मनीचा  नाचूदे
तुमच्या  माझ्या प्रीतीला सखया  पुनवेच चांदन पिउदे


----प्रसाद शुक्ल

केदार मेहेंदळे


prasad26

शिट्टी वाजवायची आहे?
मग वाजवा कि राव
वाट कसली पाहता ?

दाद आवडली . धन्यवाद