कुणास ठाऊक

Started by शिवाजी सांगळे, March 25, 2026, 03:27:05 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कुणास ठाऊक

शिकल्या सवरलेल्यांना एक अडाणी फसवतो
त्यांच्या लालसा, ईच्छांचा उपयोग करून घेतो

सुधारला समाज, म्हणून सतत डंका पिटणारा
जाहिरातींसाठी खुशाल बाबांचे फोटो मिरवतो

समाजात वावरणारा नी सत्ताकारणात रमणारा
स्वतःची बोटं कापून, रक्ताचा अभिषेक करतो

बाबा तरी काय करणार,स्वार्थींच्या घोळक्यात
कोटींची माया जमवताना स्त्रियांची अब्रू लुटतो

आता होतील सखोल चौकश्या न् आयोग वगैरे
कुणास ठाऊक! दरम्यान तो जगतो की मरतो?

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९