.जागे व्हा रे.

Started by SAGARSUT, March 04, 2012, 09:37:52 PM

Previous topic - Next topic

SAGARSUT

...जागे व्हा।...

पहातो मी स्वप्न
नव निर्माणाचे
बळ उडाणाचे
पंखात ह्या।

कर्तव्याची जाण
कायद्याचं भान
एकटूण प्राण
लढतो मी।

रोज अत्याचार
दीनांवर होती
मरतात कीती
निरागस।

असत्याचे भोगी
भरतात झोळी
सत्याच्या कपाळी
काहो गोळी?

वरती घालूणी
माणसाचा वेश
कीती अमाणूस
वागती हो।

अंधारी उजेडी
घडतात गुऩ्हे
निकालाचे पन्हे
फक्त कोरे।

तरी समाजात
निद्रिस्त हे सुज्ञ
कायद्याचे तज्ञ
झोपी गेले।

तुम्हास गडेहो
एकच मागणं
शक्य तं निदाण
जागे व्हा रे।

माझ्या .उडाण. या पुस्तकातून
.पंकज सागरबाई विनोद कांबळे (सागरसुत).

केदार मेहेंदळे