शुभ रात्री

Started by vishakha beke, March 04, 2012, 10:58:45 PM

Previous topic - Next topic

vishakha beke

रात्र झाली , चंद्र आला आकाशात
चांदण्यांना घेवून सोबत
फिरू लागला नभा मंडळात
गोल गोल गोल

चांदण्या लागल्या खेळू
लपंडाव त्या चंद्रा बरोबर
ढग ही घेती भाग खेळात
करत मदत चंद्राला लापण्यात

लपे चंद्र ढगांमागे
आणि चूकवी चांदण्यांना
चांदण्या पण खेळत चंद्राबरोबर
आसरा घेत ढगांचा

ह्या त्यांच्या खेळात
सारे नभांगण होत शामिल
कधी दिसे चंद्र - चांदण्या आभाळी
तर कधी होती लुप्त

चाले हा खेळ रात्रभर
जागवून रात्र सारी
हे बघता बघता
कशी कधी कळेना पण .....
झोपी जाते मी खरी...

### शुभ रात्री ###

vishakha beke


केदार मेहेंदळे