दोष कुणाचा

Started by kalpana shinde, March 06, 2012, 02:34:46 PM

Previous topic - Next topic

kalpana shinde


तुला दिलेली वचने मी
कर्तव्यापुढे तोडली होती
परिस्थिती पुढे सख्या
तेव्हा मी मजबूर होती 

तुझ्या त्या रूपातच मी
माझा जोडीदार पाहत होते
नियतीच्या फेकलेल्या फास्यांपुढे
तुझ्या विरहात जळत होते

जगाला मी घाबरत नाही
घाबरते ते नशिबाला
आवडते ते नेहमी हिरावले गेले
दोष आत्ता  देवू कोणाला

स्वप्नांच्या हिंदोल्याअव्वर
नेहमीच तुझी वाट पाहते
तुझे येणे राहूनच जाते
संध्याकाल  पण  टाळून जाते   

तू माझ्या मनात आहेस
नसानसात  तूच आहेस
वाईट याचेच वाटते  कि
तू माह्या नशिबात नाहीस

तुझे माझे मिलन
आत्ता तरी शक्य नाही रे
नशिबावर मी  मात केली
हे कधी-तरी  ऐकलेस का रे

कधी कधी खूप वाटते
सर्व बंधने तोडून द्यावी
नवीन जीवनाची सुरुवात
पुन्हा तुझ्यासोबतच करावी

तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण
आजही मला रडवून जातात
दूर असुंनही जवळ आहोत
हाच संधेश  देवून जातात



मोना (०६.०४.२०१०) :( :(

jyoti salunkhe

Khup Khup Sundar kavita aahe ...... :)

vaibhav2183


sia

KHUP SUNDAR....khar ahe nashibapudhe koni kahihi karu shkt nahi....

केदार मेहेंदळे

 जगाला मी घाबरत नाही
घाबरते ते नशिबाला
आवडते ते नेहमी हिरावले गेले
दोष आत्ता  देवू कोणाला


chan

Prakash Sawant

Kharach aapan prem milal nahi mhanun dukha kavtalun radat basato, pan jo ya vyuvchakrat adakto tyachya bhavna samajna khupach kathin asat....!