प्रेमभाव तुकोबाचा.....

Started by shashaank, March 06, 2012, 04:08:52 PM

Previous topic - Next topic

shashaank

प्रेमभाव तुकोबाचा....

-(पुरंदरे शशांक).

चिपळी वाजतसे करी
वीणा शोभे खांद्यावरी
नेत्री भक्तीभाव झरी
मुखे विठ्ठल उच्चारी ||

ऐसे शोभले बरवे
ध्यान तुकोबाचे साचे
वाचे उच्चारिता तुका
विठू आनंदला देखा ||

चित्तामाजी होय सुख
गाथा वाचूनिया देख
कंठी तुकाचे अभंग
हरिखला पांडुरंग ||

व्हावी विठ्ठलाची कृपा
वाटे जीवाचिया जीवा
तरी ध्यावे तुकोबाते
ध्यान तेचि विठोबाचे ||

सांठवोनि तुका आंत
गावे तुकोबाचे गीत
त्वरे येईल धावत
विठू सोडोनि वैकुंठ ||

"तुकारामबीज" निमित्ताने...........

-  पुरंदरे शशांक.

केदार मेहेंदळे


muktibodh


shashaank