चिंतन

Started by muktibodh, March 08, 2012, 11:02:04 AM

Previous topic - Next topic

muktibodh

पुन्हा गर्जुद्या रणभेरी! 

चला उचलुया पुन्हा एकदा
कुदळ,फ़ावडे अन भाले
फ़ोडुन टाकु अमानुषांच्या   
सत्तेचे हे खडे पहारे!

तुम्ही हाती वीज धरावी
अन जाळावी हतबलता
भुमीमध्ये पुन्हा दिसावी
अंकुरणारी अभीलाषा!

वादळावरी स्वार होउनी
पुन्हा गर्जुद्या रणभेरी
उधळुन लावा पुन्हा एकदा
अमानुषांची कपटी खेळी!

खवळुद्याहा सागर सारा
उलथुदे ही जुलमी सत्ता
पुन्हा नव्याने सुरु करु या
मानवतेची निर्मल पूजा!

केदार मेहेंदळे

पुन्हा नव्याने सुरु करु या
मानवतेची निर्मल पूजा!


aawdl

केदार मेहेंदळे