तू बरोबर नसल्यावर....

Started by sandip777, March 08, 2012, 06:07:51 PM

Previous topic - Next topic

sandip777



तू माझ्याबरोबर नसशील तर मी दुरावून जातो
माझ्यामधला मी हिरावून जातो
कुठलेही कार्य करण्याचे उमेद विरून जाते
तू बरोबर नसल्यावर....

तू बरोबर नसल्यावर....
काळाचे भान राहत नाही
वेळचा पत्ता लागत नाही

तू बरोबर नसल्यावर...
हसतानाही मी रडतच असतो
जगण्यात रस वाटत नाही
तू बरोबर नसल्यावर...

पण तू बरोबर असल्यावर
सगळे काही सोपे होते
सगळे दुखः विरून जाते
दिवसाही चंद्रमा भासू लागतो  तू बरोबर असल्यावर..........
[/size][/font][/color]
-
[/size][/font][/color]
संदीप बागल