माझी गाणी : स्वप्नातील सुंदरी

Started by prasad26, March 08, 2012, 06:20:14 PM

Previous topic - Next topic

prasad26

स्वप्नातील सुंदरी

एक सुंदरी आली काल स्वप्नात
गाढ झोपेत तरी वाटे सत्यात
जागविले तिने आपल्या हाताने
फिरवुनी नाजूक बोटे माझ्या केसात
एक सुंदरी आली काल स्वप्नात

नजरेला नजर माझ्या लाविली
गोऱ्या गालात हळूच ती हासली
माझेच मला काही कळेना
बघतच राहिलो तिच्या डोळ्यात

माझ्या गालावर टीचकी मारिली
मजकडे थोडी खाली ती वाकली
चेहरा तो माझा झाकून गेला
तिच्या रेशमी सुंगंधी केशभारात

एक हात माझा तिने धरिला
संगे चलण्याचा इशारा केला
चालू लागलो मी हि तिच्या सवे
तिच्या कटी भवती टाकुनी  हात

गेलो आम्ही स्वर्गीच्या प्रीतवनात
होता तिथे एक उंच प्रपात
धावतच जाऊनी उभे राहिलो
खाली झेपावणाऱ्या शुभ्र धारेत

तिची  विरल वस्त्रातली काया
ओली बिलगली तनुला माझिया
भ्रमरापरी स्वछंदी झालो
घेउनी मधुघट अधरात

मग उचलुनी तिला घेतले
बकुळीच्या तरुतळी ठेवले
फुलांच्या शेजेवर सुकाविले
माझ्या बाहूत चंद्राच्या उन्हात

--प्रसाद शुक्ल


केदार मेहेंदळे

चंद्राच्या उन्हात

shbd aavdla... kavita hi chan aahe