माझी गाणी : विज्ञानाचे दान

Started by prasad26, March 09, 2012, 03:34:39 PM

Previous topic - Next topic

prasad26

विज्ञानाचे दान

देवा तुझ्या दारी आज जमलो आम्ही सारे
मागतो दान एक देशील का सांग का रे

तुकयाने मागितले विसर न तुझा व्हावा
विश्वाचे कल्याण मागितले ज्ञानदेवा
थोर संतांच्या त्या भूमी अजून का आम्ही कोरे

विश्वची तूच आहे तू ची विश्वाचा रे कर्ता
विश्वरूप तुझे देवा रणी दाविले तू  पार्था
उघडी केलीस त्याला ज्ञानाची सर्व दारे

एकेकाळी भारतात सुवर्ण युग नांदले
वेदांमधुनी विज्ञानाचे धडे ते किती मांडले
परी आता शिकविती पश्चिमेचे ज्ञान  वारे

विकसनशील आम्ही, होऊ केंव्हा विकसित
बुद्धिवान ताऱ्यांची संख्या इथे आहे अगणित
विज्ञानाचे दान घेता तेजाळतील सारे तारे
मागतो दान हे रे देशील का सांग का रे

--प्रसाद शुक्ल