अजून देहूतल्या दुकानी.....

Started by shashaank, March 10, 2012, 09:38:28 AM

Previous topic - Next topic

shashaank

अजून देहूतल्या दुकानी.....

- (पुरंदरे शशांक)

अजून देहूतल्या दुकानी
........ विठूनामाचा गजर चालतो
इन्द्रायणिच्या डोहामधुनी
........ गाथेचा विश्वास जागतो

भामगिरीच्या शिखरावरती
........ वृक्षवल्लीही तशाच हलती
भावभारल्या हाका सरल्या
........ टपटप पाने अजून गळती

अजून इथल्या मातीमधुनी
......अबिराचा तो येतो परिमळ
पिंपुर्णीचे भाव अनावर
........ फाल्गुनातली तशीच सळसळ

शब्दाशब्दातून गाथेच्या
...... विठ्ठलभक्ति नाद उमटतो
असा आगळा भक्त लाभला
.......'धन्य धन्य मी' विठ्ठल म्हणतो.......

- (पुरंदरे शशांक)


shashaank


केदार मेहेंदळे