दिवस तुझे माझे..

Started by Rohit Dhage, March 12, 2012, 01:06:21 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

विसरली असशील तू
मी नाही विसरलो
ते हसणं खिदळणं
ते डोळ्यातून मिसळणं
ते फुलांमध्ये बागडणं
तुझं खोटं खोटं झगडणं
तुझं डोकं लढवणं
माझं डोकं चढवणं
तुझं मुसुमुसु रडणं
माझं समजूत काढणं
तुझ्या शपथा घालणं
माझ्या पळवाट काढणं
तुझं छातीवर डोकं
माझी धडधड वाढणं
चांदण्या रातीत
दोघांचं बडबडणं
काही कारण नसताना
तुझं मला टाळणं
तुझं टाळतच जाणं
माझं जळतच जाणं
सैरभैर मन माझं
तुला सारखं समजावणं
तुझं न ऐकणं
तीळतीळ काळीज तुटणं
आणि आता दिवस दिवस
खिडकीत बसून राहणं
तुझी वाट पाहणं
फक्त तुझी वाट पाहणं..

- रोहित

prasad26

Khup chan. Repeatation of  णं - in all verbs at the end - adds beauty to the poem

Rohit Dhage


केदार मेहेंदळे


Rohit Dhage


jyoti salunkhe


Rohit Dhage


pooja dehade


santoshi.world