लाइफ

Started by संदेश प्रताप, March 13, 2012, 01:02:16 AM

Previous topic - Next topic

संदेश प्रताप

आयुष्याच्या उमेदीत
अचानक भेटलो ,
उर्ट फर्ट लाइफ
मना पासून  जगलो,                                           

एका स्ट्रॉंग बियर मधे
चार पाच जण मावायचो,
भाव देत नाही "ती"
म्हणून मग लाखोली ओवायचो,

एक छोटी "गोल्डफेक"
सगळ्याना पुरायची,
औषधाला मग 
"थोटक" नाही उरायचि,

मैत्रीची व्याख्या 
सपशेल निराळी होती,
ना आशा ना अपेक्षा 
झक मारतील रक्ताची नाती

आज साला "लाइफ" म्हणे 
प्रोफेशनल झालीय,
खरा खुरा आनंद लुटण्याची
वेळ निघून गेलीय....................संदेश  प्रताप

केदार मेहेंदळे

gele te din gele...... kay karnar.