आठवणीतला वृक्ष

Started by PRANIT JADHAV, April 01, 2026, 09:35:32 AM

Previous topic - Next topic

PRANIT JADHAV

माझ्या  शाळेच्या वाटेत
होता  विशाल   वृक्ष,
सुरेख  रूप  त्याचं
वेधी  सार्‍यांचे लक्ष.

करी स्वागत  उशेचा
वार्‍या संग  डोलूनी,
रात्री मात्र  थकून
शांत  राही झोपूनी.

लटकत असे मजेने
साजिर फळे तयावरी,
पाखरे फांदयांवर बसून
किलबिल रोज करी.

मुलं त्यावर चढून
लूटी आनंद उंचीचा,
मुली दोरी  बांधून
घेइ झोका जोराचा.

भर दुपारी जेव्हा
जळे सूर्य डोक्यावरती,
वाटसरू त्याच्या पदाशी
बसून  घेइ  विश्रांती.

अनेक वर्ष सरली, नाही
पाहिलं  त्या वृक्षदेवाला,
बालपणीच्या ह्या स्मृति
हलवून जातात मनाला.
                       ---X--

             -  कवी, प्रणित शांताराम जाधव.
                कल्याण (पू)