माझी गाणी : निरोप

Started by prasad26, March 13, 2012, 04:01:19 PM

Previous topic - Next topic

prasad26


मी जेंव्हा पहिल्यांदाच परदेशी - अमेरिकेस गेलो होतो -तेंव्हा माझे वडील आजारी होते - मी एकुलता एक असल्याने त्यांना काळजी वाटत होती . आमचे कन्यारत्न फक्त दोनच महिन्यांचे होते. तेंव्हा internet तर नाहीच पण फोन सुविधा पण फार प्रगत नव्हती.   त्यावेळेस लिहिलेली ही कविता आहे

निरोप

चाललो मी परदेशी, निरोप तुमचा घेतो
साऱ्या शुभेच्छा तुमच्या संगे मी घेउनी जातो

चाललो मी परदेशी  रडता असे का  तात
सहाच महिन्यांनी कि येणार आहे मी परत

चाललो मी परदेशी, काळजी ती नाही कशाची
असता पाठीमागे हो माझी माय धीराची

चाललो मी परदेशी, सांगतो मम प्रिय कांता
मम हृदयातील तव स्मृती तारून नेईल भ्रमंता

आपुल्या हाती ग आला फणसाचा मधुर हा कापा
ओठांवरी राहील माझ्या त्याचाच सदैव पापा

चाललो मी परदेशी अंबे तव स्पर्शितो चरण
धावुनी तू येई माते करताच तुझे ग स्मरण

चाललो मी परदेशी, निरोप तुमचा घेतो
साऱ्या शुभेच्छा तुमच्या संगे मी घेउनी जातो

----प्रसाद शुक्ल

केदार मेहेंदळे