गुलाबी

Started by umesh kothikar, March 13, 2012, 05:53:11 PM

Previous topic - Next topic

umesh kothikar

चांदणे लेवून आता, ये अशी लाजत गुलाबी
दे तुझी उधळून सगळी, धुंद ही चाहत गुलाबी

लाजलेले श्वास आणि, ही निशा बघ थांबलेली
यौवनाची ही नशा अन हाय ही उल्फत गुलाबी

सांडतो गजरा तुझा अन, देह होतो पाकळ्यांचा
पाकळ्यांच्या आत अलगद, उमलते जन्नत गुलाबी

बोलतेही तू गुलाबी, पाहतेही तू गुलाबी
बघ मला बेधुंद करते, ही तुझी नीयत गुलाबी

तू गुलाबी, मी गुलाबी, पाहतो सगळे गुलाबी
तू अशी बाहूत ये अन, होऊ दे किस्मत गुलाबी



केदार मेहेंदळे

mashalllaa.... bahot khub Umeshji

shashaank

तू गुलाबी, मी गुलाबी, पाहतो सगळे गुलाबी
तू अशी बाहूत ये अन, होऊ दे किस्मत गुलाबी>>>>>>

kyaa baat hai Umesh.......

umesh kothikar


SANJAY M NIKUMBH

खरचं अशी किस्मत झाली  गुलाबी   
तर जीवन होऊन जाईन कुणाचही शराबी ......खूपच छान