आईचं पिरेम......

Started by Deepak Pardhe, March 17, 2012, 01:23:49 PM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe



आईचं पिरेम म्हणजी आभाळाची माया,

तिच्या विना जगणं म्हणजी व्यर्थ ही काया,

देवही भूका व्हता आईच्या मायेसाठी,

म्हणून त्यानं जनम घेतला अनुसये पोटी,

काय सांगू तिची महती जी जगाला ठावं,

देवानं चमितकार केला आई तीचं नावं,

आज लाख मोठा मी पण ती आईची किमया,

तीनच शिकीवलं मला अ, आ, ई लिव्हाया,

राब राब राबली कामात जावा पैसं नव्हतं पोट भराया,

कष्ट केलं तिनं लयं मला शिकंवाया,

लाख संकट आली पण आधार तिचा व्हतां,

तिच्या रुपात देवच माझ्या पाठीशी व्हतां,

माझं वचन आये तुला न्हाय सोडणार तुझी साथं,

तुझ्या प्रेमासाठी आतुरलेले मन हे गातं,

लय पिरेम दिलसं मला राहू दे तुझी छाया,

तुझ्या मायेसाठी सदा भुकेली ही काया.... सदा भुकेली ही काया.....


- दीपक पारधे

केदार मेहेंदळे


jyoti salunkhe

Deepak Really .........It is One of the Best Poem on MK   :)

Deepak Pardhe


Thanks Jyoti... i have specially wrote this for my Mom....