वेडं मन..

Started by Rohit Dhage, March 17, 2012, 03:23:49 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

फालतू गुलामीत राहणं.. सवयीचं झालं होतं
तुझ्या तिरस्काराचा, धनी झालो होतो..
अवघड होतं, या सगळ्यातून बाहेर येणं
काळजावर दगड ठेऊन, स्वाभिमान जागा करणं
बरंच झालं एक अर्थी,..
तू वर्मी घाव दिले,
आणि तुझेच पाश तुटले..
थोडं दुखावलं मन माझं..
पण मग मीच समजावलं..,
यातच भलाई होती आपली....
आणि सावरलंयही वेडं बऱ्यापैकी!,,

तुझे पाश पुन्हा पडलेले,
काल परवा पहिले मी..
परत खुणावत होते.. जवळ बोलावत होते..
वाटलं पुन्हा एकदा उधळणार हे वेडं..
पुन्हा एकदा जवळ जाणार..
पुन्हा एकदा तोंडावर पडणार..
पण तेव्हा जो शहाणपणा दाखवलाय,
हे वेडं आता वेडं राहिलेलं नाही...
इतकं सहज नाही फसणार आता हे...
आता मी निर्धास्त राहणार
आता हे सहज नाही फसणार...

- रोहित

santoshi.world

nice ... i like it very much ... keep writing n keep posting :)

Rohit Dhage