अस्तित्व

Started by swatium, March 17, 2012, 06:25:57 PM

Previous topic - Next topic

swatium



तुझा आवाज
तुझं असणं
अवघं तुझं अस्तित्वच  वेंड  लावतं
या वेडेपणात
सगळं शहाणपणच वाहून जातं
तू असलास
तरी नसतोस
तू नसलास
तरी असतोस
या तुझ्या असण्या नसण्यातच
मी भिरभिरते
खूप क्लेशकारक असतं रे हे असं भिरभीरण
वाटतं ,यापेक्षा
संपवून टाकावं सारं
हे असणं नसणं
एक वार्याची झुळूक बनून
भिरभीराव सतत तुझ्याभोवती
पण
पुन्हा भिर भिरणं आलंच नाही का !
.......................स्वाती मेहेंदळे


mahesh4812


केदार मेहेंदळे