माझी गाणी: लावणी - गुलाब

Started by prasad26, March 19, 2012, 03:08:53 PM

Previous topic - Next topic

prasad26

राया गेल्या श्रावणात, खास येउनी लाडात
तुम्ही दिल माझ्या हातात एक कलम गुलाबाच
जपून नेल मी घरी, लावलं पुढच्या दारी
नित्य ओतल्या घागरी, खत घातलं प्रेमाच
झाल आता वर्ष , सांगण्यास होतो हर्ष
सुखावतो रोज स्पर्श बहरलेल्या ताटव्याचा
सय येती तुमची फार तुम्ही याव एकवार
पाणी गुलाबच गार अन ठेविला फाया अत्तराचा

राया या हो एकदा घरी
नजर टाकावी गुलाबावरी  -धृ

येता तुम्ही अंगणात गुलाब भरेल नजरेत
येईल तुमच्या मनात हळूच लावावा हात
रंग लाल मोहक परी छटा थोडी त्यात केशरी
राया या हो --

टपोर एखाद फुल घालेल तुम्हासी भूल
टाकुनी पुढती पाऊल तोडाव तुम्ही खुशाल
घ्यावी खबरदारी तरी झाड आहे ते काटेरी
राया या हो --

एकदा पहाव गुलाबाकडे, एकदा हो मजकडे
मग भाव मनी दडे दोन्ही वरी प्रीत हो जडे
खोचावा  माझ्या केसात आवडेल तुम्हाला भारी
राया या हो --

---प्रसाद शुक्ल