माझी गाणी: लग्न ठरल्यावर

Started by prasad26, March 19, 2012, 03:54:54 PM

Previous topic - Next topic

prasad26

किती दिवस अजुनी मी बोलावे तुझ्या प्रतीमेसवे
दिनरात तुज स्वप्नी पहावे का ते ठरावे वावगे

त्या दिनी आला होतास पाहण्यास तू मला
तुजकडे बघण्याचा मजसी धीर न रे झाला
खाली मान घालूनी तुझ्या सामोरी मी बैसले
उंचावूनी पापण्या तरी एकदाच तुला पाहिले
तेंव्हाच आले रे मनी तुझीच होऊनी मी जावे

मनात माझ्या भरले तुझे ते व्यक्तिमत्व देखणे
छंद फक्त आताची तो मज  संसाराचे चित्र रेखणे
नयनात तुझ्या मी आता जेंव्हा पाहते एकटक
भेटण्यास तुजसी सखया मन होते रे अगतिक
पाहण्यास मी अधीर झाले गोड गुलाबी विश्व नवे

वाचते आता मी कधी एखादी सुरस प्रणय कथा
ती तुझी-माझीच आहे असे वाटते मजसी नाथा
लाजुनी हसते मनी मी आता ऐकता प्रेमगीत
वाटे त्या गीतातुनी वर्णिली तुझी माझी प्रीत
उडती मनाच्या गगनात, स्वच्छंदी स्वप्नांचे रे थवे


--प्रसाद शुक्ल

Umeshlondhe



केदार मेहेंदळे

ekdam mast. ek sugetion.....
prtyek kadvya nantar "किती दिवस अजुनी मी बोलावे तुझ्या प्रतीमेसवे" he ajun chan watl ast.

Pan kavita khup chan aahe.