व्यथा बळीराजाची

Started by kumudini, March 19, 2012, 05:42:54 PM

Previous topic - Next topic

kumudini

व्यथा बळीराजाची

नाही पाणी नदीला
नाही पाणी ओढ्याला
विहिरी मात्र डोलाच्या
तुडुंब भरलेल्या

नाही मोती कणसाला
फळ धरी न झाडाला
ओल्या मातीच्या वासाला
वावर पारखा झाला

आस घेऊन उशाला
भूमीवर झोपी गेला
पाही पहाटे नभाला
मेघ यायचे विसरला

चिल्ली पिल्ली भोवताला
पोटे होती खपाटीला
गायी वासरे मागताती
चार वैरण खावयाला

वरून राजा प्रार्थी येला
केले नवस सायासाला
परी घन तो करुणेचा
नाही मुळीच पाझरला

निष्टूर असा का झाला
विचाराया जाब त्याला
बांधून दोर गळ्याला
स्वर्गी निघाला जावयाला   

कुमुदिनी कालीकर

केदार मेहेंदळे


jyoti salunkhe