जुन्या आठवणी

Started by bhanudas waskar, March 22, 2012, 09:38:39 AM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

बेधुंद वारा लागेल तुला कधी
मनात उमलतील जुन्या आठवणी
क्षणात जाशील मागे वलुनी 
विचार करशील मग स्वत: हर्पुनी

तेव्हा अठावशील तू मला
आपल्या पहिल्या प्रेमाला
सर्व काही विसरुनी
मग अश्रु येतील तुझ्या नयनाला

ते पावसातील पहिल भिजन
भिजता भिजता झाडा खाली लापन
तुझ ते माझ्या सोबत फिरण
माझ्यावर जिवापार प्रेम करण

नक्कीच विसरली नसशील 
कुठे तरी मला शोधत असशील
जरी तू आयुष्यात सुखी असशील
तरी आज ही मला तू आठवत असशील

प्रेमाच काय 
पहिल प्रेम असच असत
कितीही विसरायच केल
तरी ते विसरत नसत

****भानुदास वास्कर****

manisha jadahav