पुनरावृत्ती

Started by genius_pankaj, March 22, 2012, 01:34:43 PM

Previous topic - Next topic

genius_pankaj

पुन्हा डोळे उघडावे
तेच तेच ते पुन्हा पहावे
पुन्हा पुन्हा तेच ते संदर्भ
केवळ बदलत राहती नावे

पुन्हा भेटावी  तीच माया
नित्याची तीच ती नाती
पुन्हा पुन्हा पिचावी काया
पुन्हा त्याच त्या विझणार्या वाती

पुन्हा तोच तोच मोहपाश
मन पुन्हा कुठेतरी जडावे
मग नको नको वाटेतरी पुन्हा
त्याच चिखलात रुतुनी पडावे

पुन्हा तीच पायवाट चालावी
पुन्हा पुन्हा लागावी तीच वळणे
मग तोच तो नित्याचा अंधार
पुन्हा पुन्हा ते ओसाड जगणे

पुन्हा स्वप्नभंग आणि
धाय मोकलून रडावे
अशासाठीच का जन्म सारा
की पुन्हा पुन्हा हे घडावे.................

genius_pankaj

केदार मेहेंदळे


shashaank

अतिशय सुरेख कविता. मांडणीत जरा सफाई आली की अगदी बहारदार होईल. अशाच सुंदर सुंदर कवितांची अपेक्षा आहे तुमच्याकडून.


santoshi.world

hummmm .... nice ... i like it very much ...