म्हणून कदाचित

Started by शिवाजी सांगळे, April 21, 2026, 04:40:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

म्हणून कदाचित

तू फक्त लढ जिद्दीने,प्रत्येकजण हे सांगतो
करु पहाता काही,कुणीतरी खोडा घालतो

जगरहाटी अशी चालते,खात्रीपूर्वक वाटते
स्पर्धेत जगण्याच्या, प्रवास अवघड वाटतो

हलक्यात घेवू म्हणता येथे काहीच जमेना
पावलागणिक इथे टेबल चिरीमिरी मागतो

कोणती नीतिमत्ता कोण पाळतो ते कळेना
रोज एका नव्या क्लृप्तीवर माणूस भाळतो

आदर्श म्हणून घ्यावे, भोवती कुणी दिसेना
जावून मठा,देवळात जो तो त्यांना शोधतो

त्यागता येत नाही, म्हणून कदाचित जगणे
मरणही हल्ली कुठे रे स्वस्त?म्हणून जगतो

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९