जीवन

Started by प्रशांत नागरगोजे, March 23, 2012, 10:57:47 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

जीवन हे असं जगायचं असत..

सूर्याप्रमाणे सदा चमकायचं असत
चंद्राप्रमाणे प्रेम सर्वाना द्यायचं असत
झऱ्याप्रमाणे  सतत वाहायचं असत

स्वत: साठीच राहायचं नसत
सर्वांचे हाल बघत चालायचं असत
मदतीला गरजूंच्या धावायचं असत

गंज शरीरावर चढवायचं नसत
संस्काराच झाड कधी तोडायचं नसत
आचरण कधी पापाचं करायचं नसत

विचार करून वागायचं असत
मने प्रेमाने जिंकायची असतात
शत्रूलाही मित्र करायचं असत

संकट आलं म्हणून रडायचं नसत
आज आहे उद्या नाही म्हणून
वेळेला महत्त्व द्यायचं असत

उपकार कोणाचे कधी विसरायचे नसतात
प्रेमघात कधी कोणाचा करायचा नसतो
संथ जीवनात कोणाच्या खडे मारायचे नसतात

***प्रशांत नागरगोजे *** 

shweta khatu


Samrudhdi pande

Ayushya kadhi aaroh sukhacha .kadhi avroha dukhacha. kadhi pahatechi bhupali,kahi antichi bheravi.ayushya eka surel smit


PINKY BOBADE

Atishay Surekh..............