माझ्या स्वप्नातली तू...

Started by प्रशांत नागरगोजे, March 24, 2012, 11:25:35 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

माझ्या स्वप्नातली तू
मला नेहमी मंद स्मित देणारी
नजर झुकवून, अन थोडस लाजून तू
मनाला वेड लाऊन  जाणारी.

माझ्या स्वप्नातली तू
कायम माझी वाट पाहणारी
मी येताच...वेडावून सखे तू
एक गोड मिठी मारणारी.

माझ्या स्वप्नातली तू
माझ्यासोबत मंद पाऊल टाकत चालणारी
हातात हात घेऊन अन खांद्यावर डोक ठेऊन तू
"हि वाट न संपावी..."म्हणणारी.

माझ्या स्वप्नातली तू
कधी कधी माझ्यावर रुसणारी
उसना राग वेड्या मनात आणून तू
उगाच अबोला धरणारी.

माझ्या स्वप्नातली तू
मग हळूच रडणारी
"असा का वागतोस तू " म्हणून तू
"नाही जमत तुझ्याशिवाय जगायला... " म्हणणारी.

माझ्या स्वप्नातली तू
माझं जग असणारी
मला प्रेम शिकवणारी सखे तू
माझ्याआधी माझ्यानंतर माझीच राहणारी. 

***प्रशांत नागरगोजे***