कळत नाही बुवा ..

Started by Rohit Dhage, March 24, 2012, 04:43:25 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

तुझ्या मागे लागतो
वेड्यासारखा वागतो
कधी कधी वाटतं
मी असं काय मागतो?

रात्र रात्र जागतो
तुझ्यासाठी झुरतो
कधी कधी वाटतं
तुला खरंच फरक पडतो?

मी असा का वागतो
मी असा का करतो
जे नको करायला
तेच करुन बघतो
तुझ्यासाठी मरतो
आणि मग परत वाटतं
मी माझ्यासाठी उरतो?

कळत नाही बुवा
मी असा का करतो
तुला काळजी नाही
तरी तुझ्यासाठी मरतो
तुझ्यासाठी झुरतो

- रोहित

jyoti salunkhe


Rohit Dhage