मुलीचें जिवन : हि कविता खास मुलींनसाठी....

Started by madhura, March 24, 2012, 08:58:02 PM

Previous topic - Next topic

madhura


मुलीचें जिवन हे असंच असतं,
तुझं आणि तिचं सारखचं असतं..
ज्या कुटुंबात वाढुन मोठे व्हायचं असतं,
त्याचं कुटुंबाला सोडून जायचं असतं..

ज्या आईचे बोट धरून चालण शिकायचं असतं,
त्याचं बोटाने कुंकू लावून निघायचं असतं..
ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळून मोठ व्हायचं असतं,
त्याचं खांद्यावर डोकं ठेवून रडायचं असतं..

ज्या बहीण भावाला भांडूंण रड्वायचं असतं,
त्यांनाचं सोडून जाताना रडायचं ही असतं..
मुलीचें जिवन हे असंच असतं.

-- Unknown