तुमच्या सुखात सुख मानीत गेला..!!

Started by madhura, March 24, 2012, 09:07:25 PM

Previous topic - Next topic

madhura


तुमच्या सुखात तो सुख मानीत गेला
तुमच्या आनंदात मस्त माखून गेला
तुमच्या दिव्यांची रोशनाई बघून
किती त्याला छान वाटले
त्याच्या मनात दिवे पेटत गेले

तुमची गझल वाचली
तेव्हा आंनद पसरत गेला
तुमची गझल त्याला त्याचीच वाटून गेली
मग त्याने त्याचीच पाठ थोपटून घेतली

सकाळी उठल्यावर
आपण आपल्याकडे बघतो कोठे ..?
तुमच्या घराचे रंग भिनत गेले
तुमचे रंग बघताना त्याला किती छान वाटून गेले

तुमची गाडी बघून किती छान वाटून जाते
आणलेल्या आंब्याचा सुगंध
त्याच्यापर्यंत झिरपत राहतो
आंबा न खाता तो सुगंध भरून घेतो
मन तृप्तीला लागते काय ..?
चवीचवीने खाल्ले तर छान वाटते
अगदी थोडे खाल्ले तर मन भरून जाते

त्याला कशाने बरे वाटते ..?
श्रावणाची सकाळ
भर दुपारचे ढग
कधी झिम्म पाउस
वसंतातली सकाळ
कोकिळेचा आवाज
आंब्याचा सुवास
वार्यची झुळूक
ह्याला काय द्यावे लागते .?
त्याचे मन फुलून जाते .
तुमच्या सुखात सुख मानीत गेला
नि त्याच्याच मनात दिये पेटत गेले ..आनंदाचे ...!!