देव कि दानव : (एका अनाथ लेकराची गाथा)

Started by प्रशांत नागरगोजे, March 24, 2012, 10:07:16 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

मी नकळता असतानाच तू
माझ्या आईला माझ्यापासून हिरावलास
विचारही का केला नाहीस तू?
कसं जगल तीच तान्ह बाळ इवलस?

काय  माझा अपराध होता?
जन्माआधीच मी कोणतं पाप केलतं?
डोळे उघडण्याआधीच आईचा देह होतो
तिच्या विरहाच दुख: अजून मनात सलत.

तू खरच देव आहेस का?
का माझ्यासाठी मुद्दाम दानव झालास?
तू खरच दाता आहेस का?
का मग आईशिवाय मला पोरका केलास?

आईच्या मायेची उब नाही लाभली मला
ती तर तूच चोरून नेलीस
आईच प्रेमही नाही भेटलं  मला
ते हि तू हिरावून घेतलस.

दुनिया देव म्हणते तुला
त्यांच्या आयांनी त्यांना शिकवलं
अरे कोण शिकवणार हे मला ?
काय म्हणू रे मी तुला ?

***प्रशांत नागरगोजे***