आजही आपल्या गावची पोर तस करतात का रे ???

Started by ravindra.warake, March 24, 2012, 10:46:45 PM

Previous topic - Next topic

ravindra.warake


   आजही आपल्या गावची पोर तस करतात का रे ???

शिकोरीभर तेल घेवून संध्याकाळी जातात का रे ते पारावर,
मारतात का रे ते मनसोक्त गप्पा दिव्यात तेल घालून झाल्यावर,
चार कोपरे संभाळून खेळतात का ते कोपरे कोपरे,
साध्या साध्या कारणावरून खदखदून हसतात का रे ते बावरे??
सोपान, आजही आपल्या गावची पोर तस करतात का रे ???

जून महिना आला कि घालतात का रे देवाला साकड,
देवा," पावसाकडे बघ थोड वाकड,
अजून चार दिवस पाऊस नाही आला तर धोंडी-धोंडी मी काढीन,
आलेल्या पैश्यातून चार आणे तुला देईन,
धोंडी-धोंडी च्या नावाखाली मनसोक्त पाणी पाणी खेळतात का रे?
नाऱ्या, आजही आपल्या गावची पोर तस करतात का रे ???

गवत थोड मोठ झाल के खेळतात का रे ते कबड्डी?
धुवायच असेल कुणाला तर खेळतात का ते दुंडी?
५१ रुपयासाठी उभारतात का ते दही हंडी?
हनुमान जयंतीला रामप्रहरी ते सारे जमतात का रे?
रोज रात्री ते चोर पोलीस खेळतात का रे?
योग्या, आजही आपल्या गावची पोर तस करतात का रे ???

यंदा होळीसाठी कुणाची लाकड चोरायची ह्याची करतात का रे ते चर्चा?
आणि होळीच्या दिवशी गौऱ्या जमा करण्यासाठी काढतात का रे ते मोर्च्या?
चांगली पुरणपोळी बनवणाऱ्या बाईच्या नैवद्यासाठी भांडतात का रे ते?
"होळी रे होळी पुरणाची पोळी, पुरण्याच्या पोळीवर तेलाचा कट,
ब्राह्मण म्हणतो बोकड काटा" अजूनही म्हणतात का ते?
धन्या, आजही आपल्या गावची पोर तस करतात का रे ???

आपल्या गावच्या चिंचा बोर अजूनही आंबट लागतात का रे?
आंबे अजूनही मोहरणे पांढरे दिसतात का रे?
कैर्या, वायकू, हरभरा, मक्याची अजूनही रात्री चोरी करतात का रे?
रात्री तिळ राखायला गेल्यावर मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डोर ऐकतात का रे?
गण्या, आजही आपल्या गावची पोर तस करतात का रे ???

शुक्रवारच पिक्चर बघायला अजूनही शेकोटी करून बसतात का?
आणि शेकोटीवर आता कुणाची सासू जाळायची अस विचारतात का?
शेकोटीवर प्लास्टिक च्या पिशव्यांशी खेळताना त्यांचे हाथ जळतात का?
आणि क्रिकेट बघताना तेंडूलकर ओउत झाला तर ते TV बंद करतात का?
रव्या, आजही आपल्या गावची पोर तस करतात का रे ???
                                      ..................  रवी वारके





PRASAD NADKARNI