प्रेम.. तुझं माझं

Started by Rohit Dhage, March 26, 2012, 07:27:21 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

किती सुंदर आहे ना,
किती ईश्वरी आहे..
तुझं माझ्या जवळ असणं..
मन लाऊन माझं तुझ्यात,
आणि तुझं माझ्यात जगणं..
फुलांनी नटलेलं गाव जसा,
तासनतास बघणं..
कुठेतरी मंद तारा,
धुंद वारा ..
आणि तुझं हसणं..
हलकेच गारव्यात बसणं,
समोर शेकोटीचं असणं..
ज्वाळांच्या उजेडात माझं तुला..
आणि तुझं मला बघणं..
पवित्र राहील प्रेम,
पवित्र त्याचं असणं..
लक्षात राहो न काही..
लक्षात राहील हसणं
तुझं माझं प्रेम,
आणि तुझं रुपेरी हसणं..

- रोहित


Rohit Dhage