नक्षञांचे प्रेम

Started by marathi, January 24, 2009, 12:26:33 AM

Previous topic - Next topic

marathi

नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

तिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची
त्याची सवय कही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरिही
त्याने जिद्द माञ सोडलेली नसते
तीच्या सौंदर्याचं गुणगाण करण्याचा
जणू छंदच त्याला जडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

पान-टपरी वाल्यांकडे त्याची
अगदी महिनो-महिने उधारी असते
तरी, तिच्यासाठी चंद्र-तारे आणण्याची
त्याची एका पायावर तयारी असते

तीच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार,
त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

तिच्यासाठी गुलाब तोडताना तो
कधी काट्यांचीही तमा बाळगत नाही
आणि ती सोबत असेपर्यंत त्याला,
दुःखं कधीच उमगत नाही

तिच्या क्षणभर दुराव्यानेही,
तो दुःख सागरत बुडालेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

बरं यालाच प्रेम म्हणावे तर,
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतचं प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून
अगदी शुध्द प्रेमाची आशा करतात

अशाच समाज-कंटकांमुळे,
प्रत्येकजण प्रेमात थोडा रखडलेला असतो
तरीदेखील प्रत्येकजण केव्हा ना केव्हा
एकदातरी प्रेमात पडलेला असतो
एकदातरी प्रेमात पडलेला असतो ...!!

Source : Shipla

MK ADMIN