बफार्या तुझ्या गुणांच्या (कवी - कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, March 28, 2012, 02:35:41 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore




बफार्या तुझ्या गुणांच्या


पहिल्यांदा तुला भेटल्यावर
जाणवलंच नाही मला काही
कुणास ठाऊक मी नेहमी
तुझ्या बफार्या का ऐकत राही


स्वतःला ग्रेट म्हणून आम्हाला
तू फसवण्याच्या प्रयत्नात राही
पण सर्वांनाच माहित होते
तुला काहीच येत नाही


तुझ्या सानिध्यात आल्यावर
मला कळल्या तऱ्हा तुझ्या फेकण्याच्या
का सहन मी करत असे
बफार्या तुझ्या गुणांच्या


दररोजच्या आपल्या  भेटीत
तुझं काहीतरी उदाहरण देणं
त्यात तुझं नेहमी सारखं
स्वतःचीच लाल करणं


तुझं ते गोड बोलणं
मग स्वतःची तारीफ करणं
खूप मुलांनी प्रपोज केलंय
हे पुन्हा पुन्हा मला सांगणं


इच्छा माझी नसतांना
तू गोष्टी सांगे मुलांच्या
का सहन मी करत असे
बफार्या तुझ्या गुणांच्या


कवी - कल्पेश देवरे    (बफार्या - खोटे बोलणे, स्वतःची लाल करणे - स्वतःची तारीफ करणे )