वेदना

Started by umesh kothikar, March 28, 2012, 05:07:15 PM

Previous topic - Next topic

umesh kothikar

दे हलाहल, तू तुझ्यातील
देह माझा कंठ व्हावा
आणि माझ्या वेदनेला
मोग-याचा गंध यावा

मी तुझ्यातील आसवांचे
सप्तरंगी रंग ल्यावे
मी तुझ्यातील एक-एका
वेदनेचे अंग व्हावे

स्पर्शवेडी वेदना ही
दे तुझी, माझ्यात रूजवून
गंध होईन मी सुखांचा
भोवती आणि तुझ्यातून

वाट मी, अन पावलांतून
वेदना उमटून जावी
आणि माझी मुग्ध आशा
बघ पुन्हा उमलून यावी

केदार मेहेंदळे


jyoti salunkhe